मुरबाडमधील कोरोनाच्या नवीन आकडेवाची सविस्तर माहिती | किशोर गायकवाड

मुरबाड : (दि. २९) मुरबाडमधील या आधीच्या ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सविस्तर प्रवास शब्द मशालने प्रसारित केला होता. अन् तो पुन्हा वाचण्यासाठी खालील लिंकमध्ये उपलब्ध आहे. दिनांक २७ जून पर्यंत मुरबाड तालुक्यात एकूण ३२ रुग्णांची नोंद होती. मात्र या दोन दिवसांत नवीन ६ रुग्णांची भर पडली असून हे सर्व रुग्ण पुरुष आहेत. 

  यातील ४ रुग्ण हे म्हाडस या एकाच गावातील असून मुरबाड तहसील कार्यालयाच्या उपकारागृहात कैदी म्हणून बंदिस्त होते. लागण झालेले सर्व रुग्ण पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे १९, २२, २५ आणि  ३२ असे आहे. या घटने बाबतची अधिकृत माहिती खुद्द मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांनी कळवली आहे. मात्र ही लागण त्यांना नेमकी कुठे झाली असावी? याबाबत शोध सुरू आहे. सद्या त्यांना उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

  तसेच मुरबाड शहरातील तोंडलीकर नगर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय युवकाचे रिपोर्ट ही आज पॉझिटिव्ह आले असून तो भिवंडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. सदर व्यक्ती हा कल्याण येथील खाजगी इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये कामाला असून त्याचा भाऊ, वहिनी, मुलगा आणि आईवडील यांना होम कोरोन्टाईन करण्यात आले आहे. सद्या त्याला ठाणे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे
  
  दोन दिवसांपूर्वी वैशाखरे येथील ६८ वर्षीय व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तो कल्याण येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र आज पुन्हा त्याच गावातील त्यांच्या २६ वर्षीय पुतण्याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून ते एकमेकांच्या संपर्कात आल्याचे बोलले जाते. सदर व्यक्ती मुरबाड बाहेरील खाजगी कोरोन्टाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असल्याचे समजते.

[ मागील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती साठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करा]


 
  [ मुरबाडकरांना कळकळीची विनंती करण्यात येत आहे, मुरबाडच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सद्या मुरबाडमध्ये उपचाराची व्यवस्था नाही. शिवाय मुरबाड बाहेर त्यांना उपचारासाठी स्वीकारण्यास टाळाटाळ करतात. मुरबाडची कोरोना संक्रमणाची साखळी तुटली असून आता आपल्याच आसपास असणाऱ्या पॉझिटिव्ह व्यक्तींचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. तरी सर्वांनी आपापल्या लेकरांचा, आईवडिलांचा, कुटुंबाचा विचार करून घरातच सुरक्षित राहावे व सामाजिक जबाबदारी पार पडावी, ही शब्द मशाल परिवाराकडून कळकळीची विनंती. ] 
  
  मुरबाड तालुक्याच्या आज आलेल्या रिपोर्ट्स पैकी पॉझिटिव्ह तर ११ निगेटिव्ह रुग्ण असा अहवाल प्राप्त झाला आहे.
   
थोडक्यात:-
रुग्ण संख्या:-
  • कोंडेसाखरे- ४
  • सोनारपाडा (शहर)- २
  • हनुमान आळी (शहर)- २
  • पोलीस वसाहत (शहर)- १
  • तोंडलीकर नगर (शहर)- १
  • अस्कोत- ६
  • शिरगाव- १
  • मडके पाडा- १
  • कासगाव- १
  • माळीपाडा- १
  • वैशाखरे- २
  • नारीवली- १
  • माल्हेड- १
  • म्हाडस- ४
एकूण = २८

बरे झालेले रुग्ण = ८
मृत्यू = १
आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण = ३७

8 Comments

  1. धन्यवाद. अशीच माहिती आमच्या पर्यंत पोचवत रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच... धन्यवाद

      Delete
    2. गायकवाड साहेब आपण अतिशय चांगली माहिती पोहचवता आम्ही आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो

      Delete