ब्रेकिंग : मुरबाड शहरातील दुसऱ्या कोरोना रुग्णाचा मृत्यू... (किशोर गायकवाड)

मुरबाड (दि. ३०) : एकीकडे मुरबाडमध्ये कोरोनाचा थैमान थांबत नाही, त्यात आज मृतांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.

  मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील ५८ वर्षीय व्यक्ती कॅन्सरवर उपचार घेऊन घरी परतले होते. त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दि. २१ जून रोजी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बदलापूर येथील आशीर्वाद या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. व्हेंटिलेटरच्या सहाय्याने त्यांच्या उपचार सुरू असतांना काल दुपार पासून त्यांची प्रकृती खालावली. मात्र रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांनी प्राण सोडला.
 
  त्यांचे शव स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेऊन दहन केले. मुरबाड शहरातील हा दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मृत झाल्याची घटना आहे.
  
  दि. २५ जून  रोजी त्यांच्या ५० वर्षीय पत्नीची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने सद्या त्यांना ठाणे येथील सेंट मेरी या कोरोन्टाईन सेंटरमध्ये रवाना करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याच कुटुंबातील ५ व्यक्तींचे रिपोर्ट काल निगेटिव्ह आले आहे. तर अद्याप ६ रिपोर्ट बाकी असल्याचे समजते.


[ मागील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती साठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करा ]


[ मुरबाडकरांनो आता तरी सावध व्हा! तुम्ही बाहेर फिरता अन् नकळत कोरोना खाता, मग कोरोना तुम्हाला खातो;  मुरबाडच्या बाहेर अद्याप ही उपचाराच्या योग्य सोयीसुविधा नाहीत. करोडपती व्यक्ती पैसे असून ही उपचारापासून वंचित असल्याच्या घटना समजत आहेत. या आजारापेक्षा त्याचा उपचार जीवघेणा आहे, असे म्हणणे आता चुकीचे ठरणार नाही. शब्द मशाल परिवार तुम्हाला विनंती करतो; कृपया घरातच राहा, सुरक्षित राहा! ]

मृत संख्या = २
 


____________________________________________________

नर्सरी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या दर्जेदार शिक्षणासाठी मुरबाडच्या टिळक स्कॉलर्स अकॅडमी स्कूलला संपर्क साधा

     ऍडमिशन सुरू आहेत...
     
पत्ता - टिळक स्कॉलर्स अकॅडमी, म्हाडा वसाहत, जुन्या एच. पी. पेट्रोल पंपा समोर, मुरबाड-कल्याण महामार्ग जवळ, मुरबाड

टिळक स्कॉलर्स अकॅडमी स्कूलला संपर्क करण्यासाठी डायल करा ०२५२४ - २२५९१५
व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१


___________________________________________________ 

9 Comments

  1. खुप माहिती शब्द मशाल कडून भेटत ahe

    ReplyDelete
  2. Kishor saheb shabd mashal dvare Mahit roj bhette ashich roj bhetudya dhanyavad saheb

    ReplyDelete
  3. Kishor saheb shabd mashal dvare Mahit roj bhette ashich roj Mahit bhetudya dhanyavad saheb

    ReplyDelete
  4. Kishaor dada shabd mashal dvare mahit milat ahe tnx

    ReplyDelete
  5. Kishor dada tumchyamule amhala gharat rahan kiti garjeche ahe te kalate thnak you and take care

    ReplyDelete
  6. धन्यवाद सर्वांचे

    ReplyDelete
  7. शब्दमशाल द्वारे मुरबाड मधील सर्व माहिती मिळत आहे यासाठी त्यांचे आभार...

    ReplyDelete