मुरबाड : (दि. १) मुरबाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना आरोग्य यंत्रणेला मात्र कोविड सेंटर उभारण्यासाठी मुहूर्त मिळत नाही.
मुरबाड बाहेर उपचार घेणाऱ्यांची ससेहोलपट ऐकल्यावर तो उपचार नकोसे वाटतो. मुळात लाखों रूपये भरण्याची तय्यारी असतांना ही बेड उपलब्ध होत नाही. मुरबाडमधील एक रुग्ण तब्बल दैनंदिन ५००० रुपये भाडा भरून एका हॉटेल कम खाजगी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.
मोलमजुरी करणाऱ्या एखाद्या गरिबासाठी हे शक्य नव्हे. अशातच मुरबाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीला पोहचत आली असतांना आरोग्य प्रशासन मात्र सबबी मांडत आहे. स्टाफचा अभाव, स्वच्छता कर्मचारी, वरिष्ठांची हुकूमशाही, वैगरे... वैगरे...
मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू...
मुरबाड मधून दरदिवशी तपासणीसाठी जाणाऱ्या स्वॅबची मर्यादा कमी असल्याने उपचारासाठी उशीर होत आहे. दरम्यान रुग्णाचा संपर्क वाढून सोबतच आकडेवारी ही वाढण्याचे हे ही कारण असू शकते.
याबाबत मुरबाडमधील काही डॉक्टर्सच्या टीम एकत्र येऊन खाजगी कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लागणाऱ्या स्टाफची जाहिरात ही सोशीयल मीडियाच्या माध्यमातून सुरू केली आहे. मुरबाड शहरा लगत असणाऱ्या सारिका हॉटेलच्या शेजारी हा सेंटर असू शकेल. याचे दर शासकीय दरा नुसार असतील, असे सदर या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुरबाडच्या रुग्णांची फरफट थांबणार आहे. सद्या या नव्याने सुरू होणाऱ्या कोविड सेंटरला स्टाफची आवश्यकता असून त्याबाबत या टीम कडून आवाहन केले जात आहे.
दिलासादायक : कोंडेसाखरे येथील ४ रुग्ण उपचारांती घरी
---------------------------------------------------------------------------------
नोकरी विषयक....
पदवीधर ( Graduate कोणत्याही शाखेतील ) विद्यार्थ्यासाठी सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी - ९६३८ जागा
दि. १ जुलै २०२०
घरबसल्या हा फॉर्म भरून पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क करा
( टीप : परीक्षा फी आणि आमची फी गुगल पे / फोन पे द्वारे सेंड करावी , डॉक्युमेंट्स Whatsapp करावेत )
____________________________________________________
शशी इंटरनेट पॉईंट , मुरबाड
CSC - कॉमन सर्व्हिस सेंटर
स्वामी विवेकानंद शाळेसमोर
८९७५१८०३०४ / ८३६९२५११६८
*ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) - 4624 जागा
*ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) - 3800 जागा
*ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) - 837 जागा
*ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) - 156 जागा
*अधिक सविस्तर माहितीसाठी ( वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता , परीक्षा फी , अभ्यासक्रम इ. )
आमच्या ब्लॉगला भेट द्या. :
____________________________________________________
नर्सरी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या दर्जेदार शिक्षणासाठी मुरबाडच्या टिळक स्कॉलर्स अकॅडमी स्कूलला संपर्क साधा
ऍडमिशन सुरू आहेत...पत्ता - टिळक स्कॉलर्स अकॅडमी, म्हाडा वसाहत, जुन्या एच. पी. पेट्रोल पंपा समोर, मुरबाड-कल्याण महामार्ग जवळ, मुरबाडटिळक स्कॉलर्स अकॅडमी स्कूलला संपर्क करण्यासाठी डायल करा ०२५२४ - २२५९१५व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१Email ID - tsa.murbad@gmail.com
0 Comments